अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षांपासून बहुतेक शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याने सर्व मुले घरीच आहेत.
त्यामुळे आज अनेक मुले घोळक्याने विविध खेळ खेळतात परिणामी दिवसभर गोंधळ सुरु असतो. असा गोंधळ घालणाऱ्या मुलांना अनेकदा घरातील किंवा आजूबाजूचे नागरिक गोंधळ न करण्याबाबत सांगत असतात. मात्र पुण्यात असेच गोट्या खेळू नका असे सांगतिले.
तसेच गोट्या खेळताना हटकले म्हणून त्या मुलांनी एकाच कुटूंबातील तिघांना दगडाने व हाताने मारहाण केली. ही घटना कोंढव्यातील शिवनेरी गल्ली येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शबाना शेख यांच्या सोसायटीच्या समोरील गल्लीत चार मुले गोट्या खेळत मोठ्याने दंगा करत होती. त्यामुळे त्यांना शबाना शेख यांनी येथे खेळू नका असे म्हटले. मात्र खेळू नका असे म्हटल्याचा राग येऊन त्यांनी एकत्र येत फिर्यादी शबाना शेख तसेच
त्यांच्या दोन मुलांना दगडाने व हाताने मारहाण केली. यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत शबाना शेख यांनी पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम