मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला हा उपाय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात वेगवेगळी आंदोलन करणार्‍या सर्व संघटनांना एका व्यासपीठावर येऊन सरकारवर दबाव आणावा असे आवाहान भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते.

दरम्यान या आवाहनाला आवाहनाला प्रतिसाद म्हणून मंगळवारी लोणी येथे मराठा समाजातील बहुतांशी संघटनांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आला. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काही निर्णय घेण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भविष्यातील लढाईची रणनिती ठरविण्यासाठी उपस्थित प्रतिनीधींनी महत्त्वपूर्ण सूचना करून त्यांची एकत्रितपणे ठोस कृती राज्य आणि जिल्हा पातळीवर करण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

तसेच पुढील आठवड्यात मुंबईमध्ये मराठा समाजातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान या बैठकीत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजपर्यंत राज्यात मोर्चे निघाले, कार्यकर्त्यांचे बळी गेले.

आंदोलनाच्या केसेस कार्यकर्त्यांवर दाखल झाल्या. परंतु समाजाच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळेच भविष्यात आरक्षणाची कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई नियोजनबध्दपणे करण्याचा विचार सर्वच प्रतिनिधींनी या बैठकीत मांडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe