राहताकरांना रुग्णवाढीत राहत… सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या आत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाटेस प्रारंभ झाला. आणि बघता बघता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली.

यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा प्रभावहा अधिक प्रमाणावर दिसून आला. यामध्ये राहाता मध्ये तर कोरोनाचा खर्च झालेला पाहायला मिळाला होता.

मात्र ता परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात 73 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 153 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर 166 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 19709 करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

तर 19432 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर 166 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे.

मात्र तरीही नागरिकांनी करोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, चेहर्‍यावर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe