अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- पावसाळ्यामध्ये अनेक धोकादायक तसेच जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याचे अनेक घटना घडल्या होत्या. याच पार्शवभूमीवर अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून संबंधित इमारत धारकांना नोटीस बजवाल्या जातात.
यातच शेवगाव शहरात अनेक धोकादायक इमारती असल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगर परिषदेने शहरातील धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा धाडल्या आहेत.
यामध्ये शेवगाव शहरातील माळी गल्ली, गवळी गल्ली, भारदे गल्ली, देशपांडे गल्ली, भाडाईत गल्ली, मेनरोड, इंदिरानगर, खालचीवेश आदी गल्लीतील धोकादायक इमारती, वाड्यांसह पोलीस ठाण्यासमोरील खरेदी-विक्री संघाच्या इमारतीला मंगळवारी नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान पावसाळा सुरु झाला असून याच अनुषंगाने नगर परिषदेने शहरातील ओढे, नालेसफाईला सुरुवात केली आहे. शहरातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तत्काळ शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून
परिषदने नोटिसा बजावल्या असल्या तरी यातील बहुसंख्य वाडे आणि इमारतींमध्ये भाडेकरू आणि घरमालकांचा वाद असल्याने नोटिसांचा परिणाम होत नसल्याने अनेक जिवांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम