अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी संगमनेरात घडली होती.
या घटनेतील आरोपींचा धरपकड सुरु असतानाच पुन्हा एक अत्यंत गंभीर प्रकार घडला आहे. आता पुन्हा याच परिसरात अज्ञात 3 व्यक्तींनी पोलिसांना पुन्हा धमकी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर पंडित, पोलीस कॉन्स्टेबल भोजे, पोलीस कॉन्स्टेबल भालेराव हे शहरातील तीनबत्ती चौकात गस्त घालण्याचे काम करत असताना यावेळी अचानक तिघेजण त्यांच्या समोर आले.
ते इसम म्हणाले…‘आमच्या लोकांनी मागच्या वेळेस पोलिसांना पळून मारले होते. आमच्या परिसरात पुन्हा आले तर तुमचे काही खरे नाही’ अशा भाषेत या तिघांनी पोलिसांना दमबाजी केली.
दरम्यान या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गंगाधर पंडित यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांना धमकी देऊन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्या
ऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारांचे फावल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम