सराफ व्यापारी खुनापाठोपाठ महिलेच्या खुनाचाही उलगडा; पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे ( वय- 24 ) यांंच्या खून प्रकरणातील मास्टरमाइंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड ( वय – 22 , रा . भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर ) याला मंगळवारी ( दि .1 ) नाशिक येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

शिरुर कासार येथील सराफ व्यावसायीक विशाल कुलथे यांचा खून करून आरोपी पसार झाल्याने त्याचा शोध सुरू होता. आरोपीच्या चौकशीत त्याचे इतर कारनामे उघड होत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या प्रियसीच्या डोक्यात दगड घालून राहुरी फॅक्टरी येथे 14 मार्च रोजी तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सराफा व्यापारी खुनापाठोपाठ या महिलेच्या खुनाचाही उलगडा करण्यात बीडच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

विशाल कुलथे हे सराफा व्यापारी दि.20 मे रोजी अचानक बेपत्ता झाले होते. शिरुर पोलीस ठाण्यात नोंंद झाल्यानंतर तपासाचे धागेदोरे ज्ञानेश्वर गायकवाड पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले होते , दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्ञानेश्वरने विशाल यांचा विश्वास संपादन केला.

दि. 20 रोजी दागिन्यांचे पैसे देण्याचा बनाव करत सलूूनच्या दुकानात नेऊन कात्रीने गळ्यावर वार करून खून करत दागिन्यांंसह पोबारा केला . दोन मित्रांच्या मदतीने विशाल यांचा मृतदेह दुचाकीवरून भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर येथे नेऊन शेतात पुरून टाकला होता.

या प्रकरणात ज्ञानेश्वर गायकवाडचा पिता शिवाजी गायकवाड तसेच धीरज मांंडकर ( रा. आनंदनगर, पाथर्डी) व केतन लोमटे (रा. भातकुडगाव ) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

फरार ज्ञानेश्वर गायकवाडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत व त्यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या शिताफीने नाशिकमध्ये मुसक्या आवळल्या . त्याला घेऊन पथक बीडमध्ये पोहोचले. ज्ञानेश्वरला शिरुर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली .

दरम्यान गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी केली . यावेळी त्याने नाशिक (सातपूर)येथील तरुण प्रेयसीच्या खुनाची कबुली दिली आहे. या महिलेच्या खुनाची माहिती राहुरी पोलिसांना कळविण्यात आली आहे.गायकवाड यास राहुरी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर या घटनेचा उलगडा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe