अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- भरधाव वेगातील दोन मोटारसायकलच्या समोरा-समोर झालेल्या भिषण अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना – नेवासा- शेवगाव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात असलेल्या हॉटेल जयराज नजिक घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या अपघातातील मोटारसायकलवरील कांतिलाल बन्सी भणगे (वय 46) रा. भानसहिवरे (ता.नेवासा) हे या अपघातात जागीच ठार झाले
तर दुसर्या जखमीवर नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने या जखमीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, भानसहिवरा बिटहवालदार सुहास गायकवाड, वाहतूक शाखेचे हवालदार किरण गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.
अपघातातील मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आला. नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम