अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- दुर्गम भागातील शेतकरी व सर्व सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायक ठरलेली. मात्र लाभार्थिंचा उद्दीष्ट कोटा पूर्ण झाल्याने
मध्यंतरीच्या काळात ठप्प झालेली प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भाग चूल विरहित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रकारच्या चुलींच्या रचना वापरात आल्या अन गेल्याही परंतु परिस्थिती मात्र तशीच राहिली. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना त्रास होतो आणि त्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात .
अनेक वेळा इंधन जमा करण्यासाठी महिलांची पायपीट होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक,आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन असा नारा देत केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत घरगूती एलपीजी गॅस उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला केवळ एक अर्ज करून नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन धन बँक खात्याचा नंबर, बीपीएल रेशनकार्ड , दोन फोटो देणे बंधनकारक आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम