डॉक्टरची विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

मुंबई –  केईएम रुग्णालयात एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. डॉ. प्रणय जयस्वाल (29) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

प्रणव जयस्वाल गोल्डमेडलिस्ट असून केईएम रुग्णालयात रेसिडेंट मेडिकल डॉक्टर या पदावर कार्यरत होते. ते मूळचे अमरावतीचे आहेत.

विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत.डॉ. प्रणय जैस्वाल यानी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या प्रकरणी भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकणाची पुढील चौकशी सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment