अनलॉक ! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती… काय सुरु काय बंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली.

या बैठकीत राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वेगवेगळ्या लेव्हलमध्ये अनलॉक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे, तर दुसर्‍या 5 आणि तिसरा टप्प्यात 10 आणि चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा सहभाग आहे.

  • पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे – सर्व 18 जिल्हे अनलॉकचा निर्णय
  • दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे
  • तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे
  • चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश

पहिला टप्पा (संपूर्ण अनलॉक) :- भंडारा,बुलढाणा,चंदपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना. लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ

दुसरा टप्पा (काही निर्बंध) :- दुसऱ्या टप्प्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात खालील सेवांना परवानगी :- 50 टक्के हॉटेल सुरू, मॉल्स, चित्रपटगृह – 50 टक्के क्षमतेने सुरू, मुंबई लेवल 2 मध्ये असल्याने लोकल बंदच राहणार,

सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हॉल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल, मिटिंग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत,

बांधकाम, कृषी काम खुली, जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू, शासकीय बस आसाम क्षमता 100 टक्के सुरू, जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसरा टप्पा :- अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद

तिसऱ्या टप्प्यात काय सुरू :- अत्याआवश्यक दुकाने सुरू राहणार, सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील, मॉल्स थेटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल,

शनिवार रविवार बंद राहतील, लोकल बंद राहतील, मांर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पाहटे 5 ते सकाळी 9 मुभा, 50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू, आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार स्टुडिओत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल,

मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार लग्नसोहळ्याला 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्यंत मुभा, कृषी सर्व कामे मुभा, ई कॉमर्स सेवा दुपारी 2 पर्यंत सुरू जमावबंदी संचारबंदी कायम राहील

चौथा टप्पा – पुणे, रायगड  :-

चौथ्या टप्प्यात काय सुरू? :- अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु, सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहणार, क्रीडा पाच ते 9 आऊटडोअर सुरु राहणार, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही, लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार,

अंतयात्रेला 20 लोक उपस्थित राहणार, बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार, शेतीची कामं 2 वाजेपर्यंत करता येणार, ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध, संचार बंदी लागू असणार,सलून, जिम 50 टक्के क्षमता सुरु राहणार, बसेस 50 टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

पाचवा टप्पा :- उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे निर्बंध कठोर असणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe