लस कंत्राट कुणाले दिलं? तुझ्या बापाला… मुंबई महापौरांचे ट्विट व्हायरल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यामुळे त्यांचं हे ट्विट आणि प्रत्युत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापौरांविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. अखेर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

काय आहे ट्विटमध्ये ? जाणून घ्या :- एका ट्विटर युझर्सने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिल्यामुळे महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केले असले तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे.

अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महापौरांचा खुलासा वाद वाढत चालल्यानंतर ते ट्विट डिलीट करण्यात आले. दरम्यान, या प्रकारानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खुलासा केला आहे. ट्विटरवर जे उत्तर देण्यात आलं ते मी दिलं नव्हते.

वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु असताना कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. त्या कार्यकर्त्याला समज देत ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe