अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातच घरफोडी, रस्तालूट, दरोडे, मारहाण आदी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्या आहेत.
नुकतेच अकोले येथील देशी दारुचे दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी 83 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरुन नेल्याची घट्ना घडली.
दरम्यान पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघा संशयितांना ताब्यात घेतली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीमती काशीबाई म्हतारबा डोंगरे यांच्या मालकीचे देवठान रस्त्यावर शहराजवल सरकार मान्य देशी दारू चे दुकान आहे.
2 जुनच्या रात्री अज्ञात चोरटयांनी दुकानाच्या मागिल बाजूचा दरवाजा चे कुलुप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील देशी दारूच्या 1392 बाटल्या अंदाजे किमत 83,520 रुपये एवढा माल लंपास केला.
या प्रकरणी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक आहेर हे करित आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम