अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कपाशी पिकाला सामाईक विहिरीचे पाणि मागितले म्हणून सख्खा भाऊ व भावजयने प्रकाश खडके यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने वार केला.
ही घटना दिनांक ३० मे रोजी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली आहे. प्रकाश दत्तात्रय खडके यांचे व त्यांचा भाऊ विलास यांचे तांदूळवाडी येथे सामाईक क्षेत्र आहे. ते वेगवेगळी शेती करतात. त्यामुळे सामाईक विहिरीचे पाणि आळी पाळीने घ्यायचे असे त्यांचे ठरले आहे.
दिनांक ३० मे रोजी दुपारी १२.३० वाजे दरम्यान प्रकाश खडके हे त्यांच्या सामाईक शेतात गेले. तेथे त्यांचा भाऊ विलास दतात्रय खडके व भावजय वैशाली विलास खडके दोघे राहणार तांदुळवाडी ता. राहुरी. हे तेथे होते. तेव्हा प्रकाश खडके त्यांना म्हणालो की, मी कपाशी लावली आहे.
मला आपल्या सामाईक विहीरीचे पाणी द्या. मी माझी कपाशी भरुन घेतो. असे म्हणाले असता त्यांचा माझा भाऊ विलास दतात्रय खडके व भावजय वैशाली विलास दतात्रय खेडके हे त्यांना म्हणाले की, तुला पाणी वगैरे काही नाही. असे म्हणुन त्यांनी शिवीगाळ केली.
त्यावेळी प्रकाश खडके त्यांना समजावुन सांगत असताना त्याचा त्यांना राग आला. त्यांनी प्रकाश खडके यांना लाथाबुक्याने मारहाण करु लागले. त्यावेळी त्यांचा भाऊ विलास दतात्रय खडके याने तेथे असलेला कोयत्याने प्रकाश खडके यांच्यावर वार करून जखमी केले.
तसेच तु जर परत पाणी मागीतले तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली आहे. असे प्रकाश दत्तात्रय खडके यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानूसार पोलिसात विलास दत्तात्रय खडके व वैशाली विलास खडके या दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम