कोरोनापाठोपाठ आता म्युकर मायकोसिसचे रुग्णांसाठी उपचाराचे दर निश्चित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- राज्य सरकारने करोनाच्या उपचारापाठोपाठ खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी दर निश्चित केले आहेत.

त्यामुळे म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना मोठा दिलासा आहे. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.

दरनिश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय रुग्णालयांना अधिक दर आकारता येणार नाहीत.

म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर :- वॉर्डमधील अलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी 4 हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी 3 हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 2 हजार 400 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च, जेवण यांचा समावेश. वर्गीकरणांनुसार जिल्ह्यांचा समावेश हा अ, ब आणि क गटात केला आहे. वर्गीकरणानुसार नगर जिल्ह्याचा समावेश क वर्गात होतो. त्यानुसार उपचारांचे दर जाहीर करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात असे असतील उपचारांचे दर :- वॉर्डमधील अलगीकरण: क वर्ग शहरांसाठी 2 हजार 400 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च, जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या आणि तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

  • व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण: क वर्ग शहरांसाठी 4 हजार 500 रुपये
  • व्हेंटीलेटरसह आयसीयू आणि विलगीकरण : क वर्ग शहरांसाठी 5 हजार 400 रुपये
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe