नवरदेव हळद लावून नवरीच्या घरी मात्र रिकाम्या हाताने परतला….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटल्याने अनेक मुलांना लग्नासाठी मुलींचा शोध घ्यावा लागतो. यातच लग्न जमत नसल्याने हैराण झालेला मुलगा लग्नासाठी मध्यस्थींची मदत घेतात.

या संधीच सोनं करण्यासाठी अशी मंडळी आजकाल सगळीकडे उपस्थित असतात. याचाच फायदा घेऊन नवरदेव मुलाला घोड्यावर बसून हे मध्यस्थी मंडळी वधूसह फरार होतात.

अशीच एक घटना शिर्डीत घडली आहे. नवरदेव घोड्यावर चढण्याआधीच मध्यस्थी महिला विवाहस्थळावरून गायब झाल्याने हळदीचे अंग घेऊन आलेला नवरदेव रिकाम्या हाताने परतला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथील एका गरीब कुटुंबातील मुलाला लग्नासाठी शिर्डी नजीकच्या निमगाव येथे राहत असलेल्या त्याच्या मित्राच्या पत्नीने मुलीचा फोटो दाखवला. फोटोवरून मुलाने मुलीला पसंत केले. शिर्डीत मेळाव्यात मुलीशी लग्न लावून देऊ असे ठरले.

लग्न जमवून दिल्याचा बदल्यात मित्राच्या पत्नीने आपल्याकडून 10 हजार रुपये घेतल्याचे वर मुलाने सांगितले.

विवाहाची तारीख आणि स्थळ ठरवून वर मुलगा अंगाला हळद लावून शुक्रवार दि. 4 जून रोजी नातेवाईकांना घेऊन लग्न लावण्यासाठी शिर्डीत आला होता.

मात्र त्याठिकाणी लग्न मंडप, नवरीसह मध्यस्थी नसल्याचे दिसून आले. मित्राला फोन केला तर त्याचा फोन बंद आला. त्यानंतर त्याच्या पत्नीला संपर्क केला तिचाही फोन बंद घराला देखील कुलुप होते.

हा सर्व प्रकार नवरदेव आणि वर्‍हाडी मंडळीच्या लक्षात आला. यांनंतर आपली घोर फसवणूक झाली असल्याने नवरा मुलाने नातेवाईकांसह थेट शिर्डी पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी आपल्याला नाशिक येथे तक्रार दाखल करण्यास सुचवले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe