मनपाच्या स्थायीची ऑनलाईन सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- नगर शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सुरु झालेली मनपाच्या स्थायीची ऑनलाईन सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. या ऑनलाईन सभेदरम्यान नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत नाले, गटारी सफाईसाठी कंत्राटी कामगार पुरविण्याची निविदा मंजूर करण्यात आली.

यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेत पावसाळ्यापूर्वीच निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला.

शहरातील करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वारंवार बंद राहत असल्याने सभापती अविनाश घुले नगरसेवक सागर बोरुडे, रवींद्र बारस्कर चांगलेच आक्रमक झाले.

त्यावर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी लसीचे डोस जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले असून लसीकरण सुरू झाल्याचे सांगितले.

मुंबई मनपाच्या धरतीवर लस खरेदी करण्याची मागणी यावेळी केली. मनपाने स्वतंत्र हॉस्पिटल उभारावी असा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. सभापती घुले यांनी याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe