दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावात दीड हजार झाडे लावण्याच्या अभियानाचा प्रारंभ जागतिक पर्यावरण दिनी वृक्षरोपणाने करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, वनरक्षक अफसर पठाण, भाऊसाहेब फलके, मयुर काळे, चंद्रकांत जाधव, पै.संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, संतोष रोहोकले आदी उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, वृक्षरोपण मोहिम ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे. समाजात पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे.

कोरोनाच्या संकटकाळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे अनेक झाडे नाहीसी झाली. झाडांची ही उणीव भरुन काढण्यासाठी डोंगररांगा व रस्ते हिरवाईने फुलविण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

साहेबराव बोडखे यांनी उन्हाळ्यात रखरखत्या उन्हापासून रस्त्यांच्या कडेला वृक्षाखाली विसावा घेताना वृक्षांची खरी गरज समजते. तर कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने झाडांचे महत्त्व पटले.

रस्त्यांच्या दुतर्फा झाडांमुळे रस्ता शोभून दिसतो तर पर्यावरणाचे समतोल देखील साधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोंडीभाऊ फलके यांनी नैतिक जबाबदारी म्हणून वृक्षरोपण व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe