श्रीगोंदा – तालुक्यातील कोळगाव येथील विवाहित महिलेस उसाच्या शेतात नेत अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी नितीन शिवाजी मोहारे याच्या विरोधात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इच्छे विरोधात त्या महिलेस बेदम मारहाण करत उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला.
तालुक्यातील कोळगाव परिसरात राहणार्या पीडित महिलेला शेतात कुणी नसल्याचे पाहून जवळ जाऊन तू मला आवडते असे म्हणून आरोपीने तिला बळजबरीने ओढत मारत जवळच्या उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला.
याबाबत कुणाला सांगशील तर जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. याबाबत पीडित महिलेने आरोपी नितीन शिवाजी मोहारे यांच्या विरोधात फिर्याद दिली त्यांनतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.