पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्यास सिन्नरमध्ये अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे मागील महिन्यात दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्या आरोपीला सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे पकडण्यात आले.

जगन्नाथ गुलाब जाधव (वय ३६, पिंपरी) वळण असे आरोपीचे नाव आहे. अशोक पवार व किरण गोलवड हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. वळण येथील दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी ५ मे रोजी कॉन्स्टेबल दीपक फुंदे, सुशांत दिवटे व सचिन ताजने गेले होते.

त्यांच्यावर आरोपींनी दगडफेक केली होती. मुख्य आरोपी जगन्नाथ जाधव यास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीरज बोकील,

पोलिस नाईक दिनकर चव्हाण, कॉन्स्टेबल दीपक शिंदे, गणेश सानप यांच्या पथकाने ताब्यात घेतले, अशी माहिती देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe