अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळूउपशाची नदीला पाणी येण्यापूर्वी मोजदाद व्हावी, रितसर पंचनामे व्हावेत, बेकायदेशीर उपसा झालेल्या वाळूची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जावी, अशा विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना पानसरे यांनी गुरुवारी गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते.
महसूल प्रशासनाने वाळू उपसा थांबवण्याचे आदेश दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, रवींद्र गुलाटी, अनिल भनगडे, राजेंद्र पानसरे, सोनल मुथा आदी उपस्थित होते.
पानसरे यांनी २ जूनला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते,
मातुलठाण येथील अवैध वाळूउपशाबाबत तलाठ्यापासून मंत्रालयापर्यंत निवेदन दिले, मात्र कोणीही गंभीर दखल घेतली नाही. वाळू लिलावास आपला विरोध नाही.
त्यातून शासनाला महसूल मिळतो. मात्र, अवैध उपसा करण्यास आपला विरोध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कारवाई करावी.
महसूल विभागाने शुक्रवारी त्यांना लेखी पत्र दिले असून मातुलठाण येथील वाळूउपसा थांबवण्याचे आदेश दिल्याचे त्यात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम