पत्रकार व पोलिस यांच्या हस्ते वृक्षारोपण नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच उपक्रम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे पर्यावरण दिनानिमित्त केडगाव वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत गिरी व नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

केडगाव येथील रेणुका माता मंदिर परिसरात गिरी यांच्या हस्ते व नगर तालुका पोलीस ठाणे आवारात सानप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना गिरी म्हणाले की कोरणा काळात ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत

त्याच बरोबर कोरूना काळाने समाजाला ऑक्सिजनचे महत्वही समजले आहे. नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त केलेले या उपक्रमाचे कार्य कौतुकास्पद असून यापुढेही असे उपक्रम राबवावे असे मत व्यक्त केले.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेद्र सानप यांनी नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेला शुभेच्छा देत अशाच नवीन नवीन उपक्रम मधून समाजसेवेचे काम घडावी असे मत व्यक्त केले यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य उपसंपादक मुरलीधर तांबडे,

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा खजिनदार खासेराव साबळे नगरसेवक मनोज कोतकर अहमदनगर ड्रायव्हर सेवा ट्रस्ट चे जिल्हा सचिव संतोष शिंदे, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्यामभाऊ कोतकर,

नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अन्सार शेख ,उपाध्यक्ष शिवा मस्के,रियाज पठाण,अशोक तांबे, श्याम कांबळे साबील सय्यद,रफीक शेख, शिवा म्हस्के,महेंद्र भिंगारदिवे,संजर वायकर,सोहेल मनियार,रवी कदम, आदि उपस्थित होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News