साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण या ठिकाणचा वाळू लिलाव श्री.गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित प्रेम मागो, (रा-गंगापूर रोड,नाशिक) यांनी घेतलेला आहे.

याठिकाणी मंजूरक्षमते पेक्षा अधिक प्रमाणात बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.

त्याची दखल घेत श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू उत्खननाच्या प्राप्त तपासणी व मोजमाप अहवालावरून जवळपास चौदा ब्रास अतिरिक्त उत्खनन झाले म्हणुन

मातुलठाण वाळू लिलाव ठेकेदार श्री गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे मागो यांना वाळू बेकायदेशीर उपसा केल्याप्रकरणी

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यान्वये कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस दोन दिवसाच्या खुलासा मुदतीसह पाठवली आहे.

दरम्यान नुकतेच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष यांनी गांधी पुतळा चौकात अवैध वाळू उपसा संदर्भात एक दिवसाचे उपोषण केले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांची ही नोटीस निघाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe