अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे.
मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.
अवैधरीत्या गुटखा विकला जात असून, अन्न व औषध विभाग तसेेच पोलीस प्रशासनाचा धाक दिसत नाही. संगमनेरात बऱ्याच ठिकाणी गुटखा विक्री केली जाते.
यातच तालुक्यातील निमगाव जाळी येथील गुटखाकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने तब्बल चाळीस ते पन्नास हस्तकांमार्फत शहर व तालुक्यातील प्रत्येक पान टपरी, किराणा दुकाने यांच्यापर्यंत अवैधरीत्या गुटखा विक्रीचे जाळे पसरवलेले असल्याचे पुरावे देखील आहेत.
अशा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा संगमनेर शिवसेनेने दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम