अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १५० बेडचे ६० डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे.
येथे सुमारे ८०० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असून हे कोविड सेंटर रुग्णांना जीवनदान ठरले आहे. साईबाबा रुग्णालयात ५० ते ६० बेड खाली असून साईआश्रम धर्मशाळा येथील कोविड सेंटरमध्ये ४० ते ४५ रुग्ण उपचार घेत असल्याचे वैद्यकीय अधिकारी प्रितम वडगावे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना डॉ. वडगावे म्हणाले, की संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात बालरोग तज्ञ पथकदेखील सज्ज आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती, त्यावेळीदेखील या टंचाईचा फटका रुग्णांना बसू नये, यासाठी साईबाबा संस्थानने योग्य ती खबरदारी घेतली होती.
त्यामुळे फारसा त्रास जाणवला नाही. त्यामुळे दाखल झालेल्या रुग्णांना चांगल्या पद्धतीचे उपचार देण्यासाठी संस्थान प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला होता. या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा रुग्णांना झाला आहे.
त्यामुळे रुग्णांमध्येदेखील मोठे समाधानाचे वातावरण होते, असे सांगत लोकांनी शासनाचे लोकांनी शासनाचे असलेले लॉकडाऊनचे नियम, त्यास दिलेला सकारात्मक प्रतिसाद, यामुळे रुग्ण संख्यादेखील कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
तिसरी वाट जरी आली तरी पालकांनी घाबरून जाण्याची गरज नसून त्यासाठी साईबाबा संस्थांने योग्य ती दक्षता घेतली आहे, असे डॉ. वडगावे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम