अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल. परंतु कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाची देखील कुठल्या प्रकारची गर्दी न करता काळजी घ्यावी.
असे आवाहन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथे मंत्री तनपुरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यां बरोबर बैठक घेत तालुक्याचा आढावा घेतला यावेळी उपस्थित काही गावातील नागरिकांच्या प्रश्नांची देखील त्यांनी सोडून केली.
यावेळी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांच्या घरातील कर्तीधर्ती माणसं आपल्यातून निघून गेली. अनेकांची आर्थिक गैरसोय झाली असे असले तरी राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे. कोरोनावर मात करत असतानाच पूर्ववत सर्वकाही सुरळीत सुरू व्हावे.
यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू असून, लवकरच सर्व काही सुरळीत होईल. परंतु तरी देखील नागरिकांनी कोठेही गर्दी न करता कोरोना संबंधी सर्व नियम व अटींचे पालन करावे, असे मंत्री तनपुरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती संभाजी पालवे, मार्केट कमिटीचे माजी सभापती भरत पालवे,सरपंच अमोल वाघ, राजेंद्र पाठक, शिवाजी पालवे, रवींद्र मुळे,
विलास टेमकर, अशोक टेमकर, युवा नेते राजू शेख, महेश लवांडे, सुखदेव गीते, देवेंद्र गीते, तुळशीराम शिंदे, पप्पू शिंदे, कारभारी गर्जे, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दराडे, ग्रामसेविका अश्विनी बनकर आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम