अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देशात दररोज म्युकरमायकोसिस रुग्णांच संख्या वाढतच आहे. आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर म्युकरमायकोसिसचं संकट आलं आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येत आहे.
मात्र, म्युकरमायकोसिसचं नवीन संकट उभं राहिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातही सध्या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत,कोरोना विषाणू संक्रमणावर मात करून बाहेर पडलेल्या रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या ब्लॅक फंसगचा विळखा करकचून आवळला जात आहे.
पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सुपे येथील 39 वर्षीय तरूणाचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉटेल व्यवसायीक असलेल्या या तरूणास करोनाची बाधा झाली होती.
त्यापाठोपाठ म्युकरमायकोसीस झाल्याने त्यास दोन दिवसांपूर्वी पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी हलविण्यात आले होते. दरम्यान, आठ दिवस सुपे येथील खासगी रूग्णालयात आठ दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या गुरूवारी सायंकाळी रूग्णास म्युकरमाकोसीसची बाधा झाल्याचे निदान झाले.
ससून रूग्णालयात रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतू त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याने साखरेची पातळी कमी करण्याचे डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, साखरेचे प्रमाण कमी न झाल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रीया होऊ शकली नव्हती.
त्यातच रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. म्युकर मायकोसीस आजारामुळे मृत्यू पावलेला 39 वर्षीय तरूण सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर हॉटेल व्यवसाय करीत होता. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यातच करोनाची बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पोस्ट कोव्हिड अर्थात म्युकरमायकोसीसची बाधा झाली. उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आल्यानंतर तेथे त्यांचा मृत्यू झाला. ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे आणि तो करोनाची लाट येण्यापूर्वीपासूनच आहे.
रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर वाढणं आणि अतिमात्रेची ‘स्टिरॉइड्स’ दीर्घकाळ घेणं, या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे ‘म्युकर’ बुरशीचा संसर्ग होऊन, ‘म्युकरमायकोसिस’ होतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम