अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका परिसरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या दोघांवर परिसरातील एकाने जीवघेणा हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरामध्ये मुजू कुरेशी यांच्या खोलीमध्ये मजुरी काम करणारे अर्जुन कानिफनाथ भोसले हे त्यांच्या परिवारासह भाडेकरु म्हणून परिवारासह राहत आहेत.
आरबाज उर्फ भैय्या इजाज बागवान याने घरामध्ये घुसून अर्जुन यांना तू माझ्या नातेवाईकांसोबत वाद का केले? असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने अर्जुन भोसले यांच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला.
या हल्ल्यात अर्जुन याच्या डाव्या हाताला लागून मोठी जखम झाली. यावेळी तिथे उपस्थित असणारा अर्जुनाचा मेहुणा सचिन पगारे हा अरबाजला समजावून सांगत असताना अरबाजने त्याच्या हातातील कोयत्याने सचिन पगारे याच्यावर देखील डोक्यावर वार केला.
त्यामुळे सचिन पगारे हा जमीनीवर कोसळला. त्यानंतर आरबाजने अर्जुनाची पत्नी व बहीण व सासू यांनाही मारहाण केली व त्या ठिकाणाहून पळ काढला.
याप्रकरणी अर्जुन कानिफनाथ भोसले याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरबाज उर्फ भैय्या इजाज बागवान याचेविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम