अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे.
शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साईमंदिर 5 एप्रिल पासुन भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दैनंदिन पुजा आणि आरती सुरू आहे.
मात्र साईमंदिर खुले असेल तरच भाविक शिर्डीला येतात आणि त्यानंतर व्यवसायाला गती मिळते. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत, आणि पर्यायाने अनलॉक झाले तरी व्यवसाय सुरू करून उपयोग नाही अशी अवस्था आहे.
लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. करोनाच्या संकटात एका वर्षात साईबाबा संस्थानचे उत्पन्न घटले आहे.
मागच्या लॉकडाऊनमध्ये 8 ते 9 महिने मंदिर बंद होते. मंदिर खुले करावे यासाठी आंमच्यावर त्यावेळी आंदोलन करण्याची वेळ आली होती. आत्ताही अनलॉकची प्रकिया सुरू झाली आहे मात्र मंदिर सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. शिर्डी शहरातील व्यवसायिकांचे कोटयवंधींच नुकसान झाले आहे.
अनेकांवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. शिर्डीच अर्थकारण सुरळीत आणण्यासाठी साई मंदिर सुरू करावे अन्यथा आंदोलन करावे लागेल. त्यामुळे साईमंदिर खुले करावे ही मागणी जिल्हयातील निर्बंध शिथील झाल्यानंतर जोर धरू लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम +p