शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- काँग्रेस पक्षाने कायम गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले असून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम करताना शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची कोरोना परिस्थिती, बी, बियाणे उपलब्धता, त्याचे वाटप व इतर प्रश्नांवर आढावा घेतला.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राजेंद्र नागवडे, करण ससाणे, सचिन गुजर, उत्कर्षा रुपवते,

शहराध्यक्ष किरण काळे, सुरेश थोरात, मधुकरराव नवले, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, नासिर शेख, अरुण नाईक, बाबासाहेब ओहोळ, ज्ञानेश्वर मुटकुळे, सचिन चौगुले, शिवाजी नेहे, किरण पाटील, बाळासाहेब आढाव, तुषार पोटे, दिपक भोसले, संभाजी रोहोकले, ॲड.कैलास शेवाळे,

शहाजीराजे भोसले, राहुल उगले, अमोल फडके ,कार्लोस साठे आदींसह जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ना.थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे.

काँग्रेसने कायम सर्वसामान्य व गोरगरिबांच्या हिताचे राजकारण केले आहे. हा पक्ष लोकशाही मानणारा व राज्यघटनेचा विचार जपणारा पक्ष आहे. देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसचा मोठा त्याग असून या पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी संघटनात्मक वाढ अधिक होणे गरजेचे आहे.

काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी असून शासनाच्या विविध योजना योग्य लाभार्थींपर्यत पोहोचवताना दुवा म्हणून आपण काम करावे. कोरोनाच्या संकटात सर्व तालुक्यातील पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी अतिशय चांगले काम केले आहे.

विविध ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना मोठी मदत केली आहे. ॲम्बुलन्स सुविधा दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अशा कामी स्वयंसेवकांचे काम अत्यंत कौतुकास्पद राहिले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी डॉ.तांबे म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष अत्यंत समृद्ध परंपरा असलेला पक्ष आहे. हा पक्ष गोरगरिबांच्या पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षांमध्ये अधिक बांधणी करताना संघटनात्मक पातळीवर विविध समाजातील लोकांना सामावून घेत त्यांनाही संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे.

आ.लहू कानडे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील वंचित घटकांना न्याय देत शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. ससाणे म्हणाले की, असंघटित कामगार,

बांधकाम क्षेत्रातील मजूर यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. यावेळी उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, कोरोना संकटामध्ये ज्या मुलांचे आई, वडील मृत पावलेले आहेत

त्यांच्या कुटुंबियांपर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करावे. तर श्री.नागवडे म्हणाले की, जिल्हा पातळीवर पक्ष संघटना मजबूत करून पुन्हा जिल्ह्यात काँग्रेसला वैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने काम करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe