अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट आणि लसीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले.
२१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवणार असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
यावेळी मोदी म्हणाले कि, राज्य सरकारांना देण्यात आलेला लसीकरणाचा २५ टक्के भागही आता केंद्र सरकार स्वतःकडे घेणार आहे.
या संदर्भात येत्या २ आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकारे यांच्याकडून नियमावली घोषित केली जाईल. खासगी रुग्णालयांतही लस मिळणार आहे.
तेथे केवळ लसीच्या मूल्यापेक्षा केवळ दीडशे रुपये अधिक रक्कम घेऊन ही उपलब्ध असणार आहे, असेही मोदी यांनी घोषित केले.
दरम्यान कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे आहे. देशात लसीकरण कार्यक्रम चालू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या विनामूल्य लसीकरणाचे दायित्व घेतले होते, तर राज्यांनी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचे दायित्व घेतले होते.
आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार विनामूल्य करणार आहे. लसीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि कंपन्या कमी आहेत.
आज भारतात कंपन्या नसत्या तर काय परिस्थिती उद्भवली असती. यासाठी आम्ही मिशन इंद्रधनुष्य सुरू केले.
या अंतर्गत लसीकरण केले जाईल आणि ज्याला गरज असेल त्याला लस दिली जाईल, असे ठरवले. केवळ 7 वर्षांत कव्हरेज 60 टक्क्यांवरून 90 टक्के केले. आम्ही लसीकरणाची व्याप्ती वाढवली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम