अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यामुळे गेली अनेक दिवसांपासून मार्केट मध्ये अस्थिर वातावरण निर्माण झाले होते.
मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे दिसताच तसेच अनलॉक झाल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे गडगडला बाजार आता पुन्हा एकदा सावरू लागला आहे. आज सकाळी शेअर बाजारात खरेदी मंद होती.
मात्र नंतर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 81 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी वाढून 15,751 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 228 अंकांनी म्हणजे 0. 44 टक्क्यांनी वाढून 52,328 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टिसीएस,आयसीआयसीआय बॅंक या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेल्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला. त्याचबरोबर पावर ग्रिड, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा या कंपन्या तेजीत राहिल्या.
निर्देशांक उच्चांकी पातळीवर असल्यामूळे मोठ्या कंपन्यांचे शेअर सध्या महाग आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या छोट्या कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्य निर्देशांकापेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1.38 टक्क्यापर्यत वाढले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम