अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- बचत खात्याचे पैसे गोळा करून बँकेत न भरता दीड लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शाखेचे
उपशाखाधिकारी राहुल बाळासाहेब गोडसे (भरीतकरमळा) याच्यावर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शाखेची शहरातील गणेश नगर येथे शाखा आहे. बचत गटांना या बँकेमार्फत कर्ज पुरवठा होतो.
बचत गटातील कर्जदार नेहमीच हप्ते भरतात. मात्र लॉकडाऊनमध्ये हप्ते नियमित भरूनही बँकेकडून तगादा होत असल्याने विचारपूस केली असता, हे प्रकरण पुढे आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम