भविष्यातील संकट ओळखून ‘या’ घटकांचा समावेश फ्रंटलाइन वर्कर म्हणून करण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- सरकार 45 वर्षे वयोगटाच्या पुढील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करत आहेत ही बाब समाधानाची आहे. परंतु फ्रंटलाइन वर्कर म्हणून ग्रामीण भागातील अनेक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.

तसेच त्यांना तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागामध्ये फ्रंटलाइन वर्कर अनेक घटकांचा समावेश होतो. या मध्ये कृषी सेवा केंद्राचे मालक व तेथील कर्मचारी, पत्रकार, दुध संस्थांचे सेक्रेटरी तसेच भाजीपाला दुध व इतर अत्यावश्यक साहित्यांचे माल वाहणार्‍या गाड्यांचे मालक व चालक,

पशुवैद्य, कंपाऊंडर, ग्रामीण भागातील बँक व पतसंस्थेतील कर्मचारी सर्व ग्रामपंचायतीतील सफाई कर्मचारी, किराणा दुकानाचे मालक, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पेट्रोल पंपाचे मालक व कर्मचारी वर्ग,

शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक्टर चालक यांच्यासह अन्य घटकांचे तातडीने लसीकरण करावे अशी मागणी करण्यात आले.

वरील सर्व वर्गाचा समावेश फ्रंटलाइन वर्कर यादीमध्ये करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे जेणेकरून जनतेशी थेट संपर्क असणार्‍या सर्व घटकांचा लसीने संरक्षण जर दिले तर भविष्यामध्ये येणार्‍या तिसर्‍या लाटेमध्ये ही लोक निर्भीडपणे समाजाची सेवा करतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News