पारनेरमध्ये दहशत ! बेदम मारहाण करून वृद्धाला…

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- पारनेर शहरातून सिद्धेश्वरवाडीकडे, मोपेडवरुन घरी परतणाऱ्या बाबासाहेब गबाजी नरोडे (वय ६५) यांना मोटारसायलवर आलेल्या तीन भामट्यांनी आडवून बेदम मारहाण केली.

नरोडे यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम तसेच मोपेड घेऊन ते पसार झाले. जखमी नरोडे यांच्यावर पारनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुुमारास ही घटना घडली. रस्तालुटीच्या घटनेमुळे पारनेर पंचक्रोशीत दहशत निर्माण झाली.

बाबासाहेब नरोडे हे सिद्धेश्वाडी येथून पारनेर येथे वयक्तीक कामासाठी आले होते. काम उरकून ते पानोली रस्त्याने सिद्धेश्‍वरवाडीकडे परतत असताना चाटे किडस् स्कूल परिसरात त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकलवर तीन भामटे आले.

नरोडे यांची मोपेड आडवून नरोडे यांना थांबण्यास त्यांनी भाग पाडले. तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. वयोवृद्ध नरोडे हे त्यांना प्रतिकार करू शकले नाहीत.

भामट्यांनी त्यांच्याजवळील रोख रक्कम, त्यांचा मोबाईल तसेच त्यांच्याजवळील मोपेड ताब्यात घेऊन ते पसार झाले.

याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर नरोडे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी पद्मणे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe