लाॅकडाउन संपलेला नाही, फक्त काही अटी शिथिल; मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले…

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-कोरोनाअजून संपलेला नाही. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात आलेलं नाही. काही अटीच शिथिल करण्यात आलेल्या आहेत. एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत.

त्यापैकी 18 युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील.

त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. मास्क न घातल्यास होणार कठोर कारवाई केली जाईल असेही वडेट्टीवार म्हणाले.

अनलॉकचे पाच टप्पे :

  • पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
  • दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
  • तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
  • चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील
  • तर पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!