लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता औषधांची गरज नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांत महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता ज्या रुग्णांत कोरोनाची लक्षणे नसतील किंवा ती खूपच सौम्य असल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही.

मात्र, त्यांना इतर आजारांची औषधे सुरू असतील तर त्या सुरूच राहतील. अशा रुग्णांनी अावर्जून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पोषक आहार घेतला पाहिजे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या आवश्यक नियमांचे पालन केले पाहिजे. या गोष्टी केल्या की ते कोरोनातून बरे हाेतील.

आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचारांतून सर्व औषधांची यादी हटवण्यात आली आहे. यात ताप, सर्दी-खोकल्याच्या औषधांचाही समावेश आहे.

गाइडलाइनमध्ये म्हटले आहे की, अशा रुग्णांना दुसरी चाचणी करण्याचीही गरज नाही. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून २७ मे रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.

त्यानुसार कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना झिंक, आयव्हरमेक्टिन, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, डॉक्सीसायक्लिन व मल्टिव्हिटामिन देण्यास मनाई करण्यात आली होती. लक्षणे नसलेल्या रुग्णांना सीटी स्कॅनसारख्या अनावश्यक चाचण्या लिहून देण्यासही मनाई करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe