आमदार निलेश लंके म्हणाले लोकप्रतिनीधींना शोधण्याची वेळ यावी हे लोकांचे दुर्दैव

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- सामाजिक कार्यात प्रताप ढाकणे हे नेहमीच अग्रेसर असतात. मी जेव्हा माझ्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली, तेव्हा प्रताप काकांनीच मला संघर्ष करण्याची शिकवण दिली.

इथल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत थोडी अजून साथ दिली असती तर आज या भागाचे चित्र वेगळे असते. लोकप्रतिनिधी लोकांच्या संपर्कांत असावा लागतो, लोकांना त्याला शोधण्याची वेळ यावे, हे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन आ.निलेश लंके यांनी केले.

आ. लंके यांनी सोमवारी सुमन ढाकणे कोविड सेंटरला भेट दिली. थेट कोरोनाग्रस्त रुग्णांजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. या कोविड सेंटरच्या कामकाजाची माहिती घेत बोलताना म्हणाले, ढाकणे कुटुंब अनेक वर्षांपासून समाजकार्यात आहे.

💁‍♂️ पंचायत समितीच्या गेटसमोर दोघांत हाणामाऱ्या 

पारनेरमध्ये मी सामाजिक जीवनाची सुरुवात केल्यावर वारंवार प्रताप ढाकणे यांचे मार्गदर्शन घेत गेलो. संघर्षांची शिकवण त्यांच्याकडूनच मिळाली. कायम लोकांच्या संपर्कात राहिल्याने समाजमन कळले. सुमन कोविड सेंटरची दखल पक्षानेही घेतलेली आहे.

ज्यांनी या काळात पुढे यातला हवे त्यांनाच शोधण्याची वेळ इथल्या लोकांवर यावी, हे दुर्दैवी आहे. चांगल्या काळात तर कोणीही येतो मात्र खरी गरज अशा वेळेस दिसते. प्रताप ढाकणे यांना संधी मिळाली असती तर त्यांच्या नेतृत्वात या परिसातारत वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.

💁‍♂️ कोरोनाला ‘नो एंट्री’… जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ४५ गावे कोरोनामुक्त  

मात्र तरीही ढाकणे सामाजिक उत्तरदायींत जोपासून संकटात काम करतात, हे फार मोठया मनाचे काम आहे. या कार्यात आपण शेवटपर्यंत त्यांना साथ देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

योगेश रासने यांनी सेंटरची माहिती दिली. यावेळी देवा पवार, शिवसेनेचे रफिक शेख, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब घुले, अक्रम आतार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.एम.पी.आव्हाड व शिवाजी बडे यांनी लंके यांचे स्वागत केले.

ह्या बातम्या तुम्ही वाचल्यात का ?

  1. आमदार निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये शुभ मंगल सावधान….
  2. आमदार निलेश लंकेच्या मतदारसंघात आढळला म्युकरमायकोसिसचा रुग्ण
  3. आमदार लंकेच्या नोटीसला मनसेचे प्रत्युत्तर, बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, …
  4. आमदार निलेश लंके यांच्या नावाची खासदारकी साठी चर्चा !
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News