कोरोना संसर्गामुळे 14 जून रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंधाचे आदेश जारी केले असून, सदर निर्बंध 1 जून 2021 ते 15 जून 2021 पर्यंत लागू असणार आहे.

त्यामुळे 14 जून 2021 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार,प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे करण्यात येते.

परंतु कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सदरचा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. नाशिक विभागातील नाशिक,

अहमदनगर,धुळे, जळगांव आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe