पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडत महंतांची आत्महत्या 

Ahmednagarlive24
Published:

प्रयागराज –  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे निरंजनी आखाड्याचे महंत आशिष गिरी यांनी रविवारी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. 

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी, पोलिस उपमहानिरीक्षक के. पी. सिंग आणि पोलिस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली. आजारपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे धर्मगुरूंच्या वतीने सांगण्यात आले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी सांगितले की, सकाळी त्यांचे आशिष गिरी यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते.

नाष्ट्यासाठी त्यांना वाघम्बरी गादीच्या मठात आमंत्रित केले होते. अंघोळ करून तेथे पाेहोचतो, असे आशिष गिरी यांनी सांगितले होते. ते न आल्यानेे मठातील शिष्य दारागंज येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता.

खाली जमिनीवर रक्ताने माखलेले आशिष गिरी यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्या हातात पिस्तूल होते. नरेंद्र गिरी यांनी पुढे सांगितले की, आशिष गिरी यांना उच्च रक्तदाब आणि पोटाचा आजार होता. त्यांचे लिव्हरही खराब झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment