अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बेरोजगार युवक / युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय क्षेत्रामध्ये प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.
ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत
अहमदनगर जिल्ह्यातील बेरोजगार वैद्यकिय क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन रोजगार करण्यात इच्छुक उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण विनामुल्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
अॅम्ब्युलंस ड्रायव्हर, असिस्टंट ड्युटी मॅनेजर, पेशंट रिलेशन सर्व्हिसेस, सेंट्रल स्टेरियल सर्व्हिस डिपार्टमेंट (सी एस एस डी), असिस्टंट, ड्रेसर (मेडिकल), ड्युटी मॅनेजर (पेशंट रिलेशन सर्व्हिसेस), एल्डर्ली केअर टेकर (नॉन क्लिनीकल),
इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन-बेसिक, हेल्थकेअर अॅश्युरन्स मॅनेजर, हॉस्पिटल फ्रंट डेस्क को-ऑर्डिनेटर, मेडिकल रेकॉर्डस अॅण्ड हेल्थ् इन्फॉर्मेशन टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्डस असिस्टंट, पेशंट रिलेशन्स असोसिएट, प्रधानमंत्री आरोग्य मित्र,
सॅनिटरी हेल्थ एड इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केलेले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांना कोणतेही प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार नाही.
या कोर्सेसकरिता वयोमर्यादा 18 ते 45 ईतकी आहे. सदरचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या उमेद्वारांनी शैक्षणिक पात्रता व अधिक माहिती https://forms.gle/Z87Hp2XwS4NSTSS97 या गुगल फॉर्म लिंकवर भरुन पाठवावी.
याबाबत काही अडचण असल्यास 0241-2425566 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा कौशल्य केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम