अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- मुंबईत दाखल झालेला मॉन्सून रौद्ररुप धारण करत असतानाच आता मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढचे चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपर्यंत मुंबईल पावसाने झोडपले आहे. अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस आहे.
अंधेरी, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरीत मुसळधार पाऊस असून मुलुंड, भांडुप, घाटकोपर परिसरात पावसाची संततधार आहे. काही तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच मागील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अशात 11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.यादिवशी रत्नागिरीत पडणारा पाऊस ढगफुटी प्रमाणे असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज मॉन्सूनचे आगमन झालेले आहे.
सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम