अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- एका देशी दारूच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांची दारू लंपास केली केली. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराही काढून नेला.
चोरीची हि घटना श्रीरामपूर शहरालगत अशोकनगर फाट्याजवळ घडली आहे. याप्राकरणी श्रीरामपूर शहर पोली ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोकनगर फाट्याजवळील देशी दारूच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटुन चोरट्यांनी आत प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसान केले. चोरट्यांनी काऊंटरच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आतील गोडाऊनमधील
1 लाख 96 हजार रुपये किमतीची दारू व तोडलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्या डिव्हीआर मशीनसह चोरून नेले. याबाबत हर्षल महेंद्र गुप्ता यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम