शिर्डीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र अनलॉक होताच अवैध धंदे सुरु झाल्याचे दिसून येऊ लागले आहे.

यातच जिल्ह्यातील शिर्डी मध्ये पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शेळके कॉर्नरसमोर दिवसा ढवळ्या व रात्री भर चौकात बंद दुकानासमोर बसून काही महिला वेश्या व्यवसाय करीत असल्याची नागरिकांची तक्रार पोलिसांपर्यंत पोहचली होती.

त्या परिसरातून नागरिकांना जाताना संकोचल्या सारखे वाटत. मात्र काही आंबट शौकीन याच परिसरात घुटमळत दिसायचे त्याचा त्रास बऱ्याच जणांना होत होता.

बुधवारी रात्री अचानक तेथे असलेल्या काही महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस नाईक मकासुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामधील काही महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातवारे इशारे करून असभ्य वर्तन करत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस अधिक तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe