अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचून, उदरनिर्वाह करणार्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव गावातून जाणाऱ्या नगर- दौंड राज्य मार्गावर घडली आहे.
बाळासाहेब बबन फटे (वय ५६) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाळासाहेब बबन फटे (वय ५६) राहणार मढेवडगाव हे सायकलवरून आपल्या घरी परतत असताना,
नगर दौंड रोडवरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाले.
या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी १०८ क्रमांकावर फोन करून ॲम्बुलन्स मागवली. मात्र, त्यात आलेल्या डॉक्टरांनी अपघातग्रस्त फटे यांची प्राथमिक तपासणी करून,
ते मयत झाले असल्याचे सांगितले. यानंतर मयत बाळासाहेब फटे यांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम