किचनचा दरवाजा उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले ; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. रात्री तर चोरटे जास्त सक्रिय असतात मात्र आता दिवसाढवळ्या देखील चोर्या करू लागल्या आहेत. यामुळे नागरिक स्वतः काळजी घेताना दिसत आहे,.

मात्र शहर परिसरातील एका कुटुंबाला किचनचा दरवाजा उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. चोरटयांनी घरात घुसून तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बागरोजा हाडको येथील रेणाविकर कॉलनीत सिव्हील इंजिनिअर विनोद छगनराव काकडे हे राहतात.

सर्व कुटुंबीय घरात बसले होते. दरम्यान काकडे यांच्या आई रात्री झोपताना किचनचा दरवाजा बंद करण्याचे विसरल्या होत्या.

नेमका याचा संधीचा फायदा घेत चोरट्यानी घरात घुसून कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी काकडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.