निवांत झोपलेल्या मेंढपाळावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना काहीश्या थांबल्या होत्या,. मात्र आता पुन्हा बिबट्याने दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढपाळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ गावांतर्गत येथे घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ कुशाबा हरिभाऊ देवकर हे जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जांबुत बुद्रुक येथील मेंढपाळ कुशाबा हरिभाऊ देवकर हे मेंढ्या चारण्यासाठी नांदूर खंदरमाळ शिवारातील लहुचामळा येथे आले आहेत. रात्रीच्या सुमारास मेंढ्या वाघुरीत कोंडल्यानंतर ते वाघुरी जवळच झोपले होते.

तसेच कुत्राही त्यांच्या जवळच बसलेला होता. दरम्यान, अचानक बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली. परंतु, शेजारी असलेल्या देवकर यांनाच बिबट्याने जोराचा पंजा मारला. त्यामुळे त्यांच्या तोंडावर नखी ओरखडल्याने ते जखमी झाले.

या घटनेची माहिती समजताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. दरम्यान जखमी देवकर यांना औषधोपचारार्थ घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe