‘ या’ शहरात सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत दुकाने सुरू राहणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- ११ जून पासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू रहाणार आहेत . त्याचप्रमाणे “दर रविवारी” १००% जनता संचारबंदी असणार आहे.

मात्र रविवार वगळता हॉटेल-रेस्टॉरंट-खानावळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधींची बैठक आज नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली.यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उप मुख्याधिकारी सुनील गोर्डे उपस्थित आदींसह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

यामध्ये .उद्या दि.११ जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ठेवणे ,तसेच .”दर रविवारी” १००% जनता संचारबंदी पाळण्यावर सर्वानी संमती दर्शवली .यामध्ये रविवार वगळता हॉटेल-रेस्टॉरंट-खानावळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील.

यादरम्यान अत्यावश्यक सेवाही सुरू रहातील. त्याठिकाणी फक्त औषधांचीच विक्री केली पाहिजे,असाही निर्णय घेण्यात आला. बाहेर पडताना प्रत्येकाने मास्कचा वापर करावा,सुरक्षित अंतर ठेवावे,विनाकारण रस्त्यावर फिरू नये-गर्दि करू नये.

सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले तरच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो प्रशासनास कठोर कारवाई करण्याची वेळ आणू नये . कोरोनाचे नियम पाळून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.