अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोना हा कोणालाच न परवडणारा नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून व तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
मास्क न वापरणांऱ्यावर कारवाई करा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पाथर्डी तालुका प्रशासनाला दिले.
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन तयार होणाऱ्या कॉन्सन्ट्रेटर प्रोजेक्टचे उद्घाटन क्षीरसागर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. क्षीरसागर म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे
जे दुकानदार मास्क वापरणार नाहीत किंवा दुकानात आलेल्या ग्राहकांमध्ये सुरक्षित अंंतर ठेवणार नाहीत अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी.
शनिवार रविवार पूर्णपणे दुकाने बंद ठेवून दुकानांचा सकाळी सात ते सायंकाळी सात हा वेळ देखील कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.
यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, सरपंच आदिनाथ सोलाट, उपसरपंच अरुण बनकर, सुभाष गवळी,विजय गुंड ,संभाजी झाडे,राजू शेख, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, विस्ताराधिकारी दादासाहेब शेळके,ग्रामसेवक राजेंद्र साखरे, प्रमोद म्हस्के उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम