अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथे चौघांनी किरकोळ कारणावरून दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खंडेरायवाडी येथे आदेश भाऊसाहेब चाचन हा तरुण गुरुवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये असताना, नीलेश अशोक तळेकर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आदेश याच्या शेतात घेवून आला आणि ढेकळं फोडू लागला.
त्यावेळी आदेश हा त्यास म्हणाला की ‘तु आमच्या शेतात ट्रॅक्टर का घातला’ असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने आदेश यास शिवीगाळ केली.
त्यावेळी तेथे भारत रावसाहेब तळेकर, अशोक रावसाहेब तळेकर, राजेंद्र आबाजी ढेरंगे हे आले त्यांनीही आदेशला शिवीगाळ केली.
भारत तळेकर याने त्याच्या हातातील दगड आदेशच्या पाठीत मारला. यावेळी आदेशची आई जयाबाई चाचन व आदेशचा भाऊ शशीकांत चाचन वाद सोडविण्यास आले असता
त्यांना देखील भारत याने हातातील दगडाने जखमी केले आणि खाली ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी आदेश चाचन याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम