दुकानांत घुसून भंगारवाल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यातच विनयभंगाच्या घटना देखील घडत आहे.

असाच एक प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. यामुळे परिसरातील महिला वर्गामध्ये भीती निर्माण झाली आहे.

घडली घटना अशी कि, श्रीरामपूर शहरातील रामनगर परिसरातील एका व्यक्तीने एका टपरीमध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून, मिठी मारून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

पिडीत मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपी त्याठिकाणाहून पळून गेला. सद्दाम रशीद शहा वय ३२ (व्यवसाय भंगारवाला) याने हे कृत्य केले आहे.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर तत्काळ मुलीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी सद्दाम शाहाच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सद्दाम रशीद शहा यास अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe